मुंबईचे वादग्रस्त माजी पोलिस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये; ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता

243 0

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून ते वर्सोव्यातून महाविकास आघाडी तर्फे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दीड महिन्यांपूर्वी झुलेलाल मंदिरात पूजा करतानाचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट करत विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते.

परंतु त्यांनी कोणताही पक्ष जाहीर केला नव्हता. आज त्यांनी मुंबईमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याबद्दल त्यांना महाविकास आघाडी तर्फे वर्सोव्यातून विधानसभेचे तिकीट दिल जाऊ शकतं.

मी कायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चर्चेत आले होते.
संजय पांडे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतलं. पांडेंनी मुंबईचे पोलीस आयुक्तपदही भूषवले आहे.

पांडे अनेकदा वादात अडकले असून सप्टेंबर 2022 मध्ये त्यांना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचार्‍यांशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर पांडेंना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. पांडेंना महाविकास आघाडीकडून वर्सोव्यातून विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide