तिसऱ्या आघाडीचं ठरलं; परिवर्तन महाशक्ती म्हणत महायुती महाविकास आघाडीला देणार लढत

102 0

आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे केली. व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा करण्यात आली.

स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे म्हटले की, ‘महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम व सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता, पुर्वी मोठ्या गावांना बुद्रुक व छोट्या गावांना खुर्द म्हटले जायचे तशीच शिवसेना व राष्ट्रवादी ची अवस्था झालेली आहे.’

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हटले की,’ महाराष्ट्राच्या राजकारणाचा सातबारा कोणत्याही पक्षाच्या नावावर केलेला नाही, ‘परिवर्तन महाशक्ती’ चे नेतृत्व सामूहिक असेल.’

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू बोलताना म्हटले की, ‘आमच्या जवळ विचारांचा व मुद्द्यांचा अजेंडा आहे, ज्या पक्षांना व संघटनांना आमच्या परिवर्तन महाशक्ती मध्ये सहभागी होयचे असेल त्यांच्यासाठी आमचे दालन उघडे असेल.’

महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे म्हटले की, ‘महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा लक्षात घेता, प्रस्थापित आघाड्यांना एक आश्वासक पर्याय देण्याचा निर्णय व निश्चय आजच्या बैठकीत झाला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चांगले काम करून दाखवतील असा विश्वास आहे.

स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप यांनी सांगितले की,’ येत्या २६ सप्टेंबर रोजी परिवर्तन महाशक्ती च्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच परिवर्तन महाशक्ती मध्ये विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे.’

यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुश कदम, माधव देवसरकर यांच्यासह सर्व पक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : खळबळजनक ! पुण्यात मायलेकींचे संशयास्पद स्थितीत आढळले मृतदेह

Posted by - October 20, 2023 0
पुणे : इंदापूर तालुक्यातील (Pune News) हगारेवाडी येथे मायलेकींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरात दोघी मृतावस्थेत…
Pune Death

पुण्यात भरधाव दुचाकीने महिलेला उडवले; Video आला समोर

Posted by - May 29, 2023 0
पुणे : पुण्याच्या कर्वेनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका दुचाकीस्वाराने एका महिलेला उडवले. ही…

PHOTO : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन

Posted by - August 24, 2022 0
पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले. यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज…

ब्रेकिंग न्यूज ! पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल,काय आहे प्रकरण ?

Posted by - February 26, 2022 0
पुणे- बेकायदेशीरपणे टेलिफोन टैपिंग केल्याप्रकरणी माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या…

10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच ! राज्य शिक्षण मंडळाची घोषणा (व्हिडिओ)

Posted by - February 3, 2022 0
पुणे- मार्च-एप्रिल 2022 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *