पुण्यात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटना वाढत असल्यास निदर्शनास येत आहे. त्यातच दोन अल्पवयीन मुलींना दारूपासून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळ त्यांना घटना पुण्यातून समोर आली आहे.
याप्रकरणी ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय 27, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय 20, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) व यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय 21, रा. सावळ, ता. बारामती) या तिघांना पोलिसांनी अटक केली असून चौथा आरोपी फरार आहे. त्याचा देखील शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही अल्पवयीन मुली बारामतीतील असून दोन वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीत शिकत आहेत. मात्र त्या टेक्निक यांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघीही घरच्यांना कोणतीच कल्पना न देता अचानक एसटी बसने पुण्याला आल्या. 14 सप्टेंबर रोजी या दोघी पे पत्ता असल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात नोंद केली गेली. दुसरीकडे या दोघींनी पुण्यात पोहचताच आरोपी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने तात्काळ या दोघींना हडपसर परिसरात असलेल्या रूमवर बोलावले. आणखी एक आरोपी बारामतीतून हडपसरला पोहोचला. तर ज्ञानेश्वरने इतर दोन मित्रांना या दोन मुली रूमवर येत असल्याचं सांगितलं.
हडपसर मधील एका मित्राच्या रूमवर या मुलींना नेऊन रात्री त्यांना दारू पाजण्यात आली. दारूच्याच नशेत चार आरोपींनी या मुलींवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. या मुली शुद्धीवर आल्यानंतर यातील एका मुलीने हडपसर येथील एका प्रवाशाच्या मोबाईल वरून आईला फोन करून घटनेची माहिती दिली. तिच्या आईने तात्काळ पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली.
तातडीने बारामतीतून महिला पोलिस कर्मचाऱ्यांचं एक पथक हडपसरकडे रवाना झाले. या मुलींना ताब्यात घेऊन बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. मुख्य आरोपी ज्ञानेश्वर आटोळे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. इतर आरोपींचा शोध घेऊन आणखी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून एक आरोपी मात्र फरार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड यांनी दिली.