गणेशोत्सवासाठी पुण्यात येत आहात तर वाचा ही बातमी; शहरातील पंधरा प्रमुख रस्ते राहणार बंद

207 0

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि यामुळेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 11 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान सायंकाळी पाच ते रात्री गर्दी संपेपर्यंत पुणे शहराच्या मध्यवस्तीतील 14 रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे

गौरी आणि गणपतीच्या विसर्जनानंतर पुणे शहरात मंडळांचे देखावे पाहण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या गर्दीमुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व गणेश भक्तांना गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

शहरातील कोणते रस्ते बंद राहणार व कोणते पर्यायी मार्ग असणार आहेत पाहूयात?

  • लक्ष्मी रस्ता हमजेखान चौक ते टिळक रोड हा रस्ता बंद राहणार आहे यासाठी पर्यायी मार्ग डूल्या मारुती चौकातून उजवीकडेवळून दूधभट्टी वरून सरळ दारूवाला पुलाकडे जाता येईल. 

  • हमजेखान चौकातून उजवीकडे वळून महाराणा प्रताप रस्त्याने सरळ घोरपडीपेठ पोलीस चौकीपासून पुढे शंकरशेठ रस्त्याने जाता येईल 

  • शिवाजी रस्ता स.गो. बर्वे ते जेधे चौकपर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे यासाठी पर्यायी मार्ग शिवाजीनगरवरून स्वारगेट कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स.गो. बर्वे चौक जय मस्त टिळक रोड किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा शिमला चौक कामगार पुतळा चौक शाहीर अमर साबळे चौक बोल्हाई चौक मार्गे नेहरू रस्त्याचा वापर करून स्वारगेट कडे येणाऱ्या रस्त्याचा वापर करावा 

  • कुंभारवेस चौक पवळे चौक साततोटी चौक योजना हॉटेल कडून उजवीकडे वळून देवजी बाबा चौक हमजेखान चौक महाराणा प्रताप रस्ता मार्गे घोरपडीपेठ पोलीस चौकी घोरपडीपेठ उद्यान झगडेअळी ते शंकर शेठ रस्ता मार्गे जाता येईल

  • बाजीराव रस्ता पुरम चौक ते अप्पा बळवंत चौक पर्यंत चा रस्ता बंद राहील यासाठी पर्यायी मार्ग पुरम चौक टिळक रोडने टिळक चौकातून उजवीकडेवळून केळकर रस्त्याने आप्पा बळवंत चौक 

  • टिळक रस्ता मराठा चेंबर्स ते हिराबाग चौक रस्ता बंद राहणार आहे यासाठी पर्यायी मार्ग जेथे चौक नेहरू स्टेडियमजवळील एकेरी मार्गाने जमनालाल बजाज पुतळ्याकडून उजवीकडे वळून पुरम चौक व हिराबाग 

  • सिंहगड गॅरेज घोरपडी पेठ ते राष्ट्रभूषण ते हिराबाग चौक रस्ता बंद राहणार आहे पर्यायी मार्ग सिंहगड गॅरेज चौकातून उजवीकडे झगडेवाडी वेगा सेंटरपासून शंकरशेठ रस्ता 

  • दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक हिराबाग चौक रस्ता बंद राहील. 

  • यासाठी पर्यायी मार्ग दिनकरराव जवळकर रस्त्याने सरळ बाजीराव रस्त्यावरून डावीकडे वळून टेलिफोन भवन ते पुरम चौक टिळक रस्त्याने वाहन चालकांना इच्छितस्थळी जाता येईल 

  • कैलासवासी अनंत बाळकृष्ण नाईक पथ (जगदीश गॅरेज उप-रस्ता) ते टिळक रस्त्याकडे जाण्यास बंदी 

  • सणस रस्ता गोटीरामभैय्या चौक ते गोविंद हलवाई चौकापर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग गोटीरामभैय्या चौक गाडीखाना सुभेदार तालीम डावीकडे वळून कस्तुरी चौक डावीकडे वळून गोविंद हलवाई चौक या रस्त्याचा वापर करता येईल 

  • पानघंटी चौक ते गंजपेठ चौकीपर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे यासाठी पर्यायी मार्ग पानघंटी चौक जैन मंदिर चौक फुलवाला चौक कस्तुरे चौक उजवीकडे वळून गंजपेठ चौकी मार्गे इच्छित स्थळी जाता येईल 

  • गंजपेठ चौकातून वीर लहुजी वस्ताद तालीमकडे जाण्यास बंदी 

  • गाव कसाब मशीद स्ट्रीट चौकीपर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे यासाठी पर्यायी मार्ग गाव कसाब मशीद बाबाजान चौक शरबतवालाचौक सेंट्रल स्ट्रीट चौकी मार्गे जाता येणार आहे 

  • कोहिनूर चौक ते बाबाजान चौकपर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे 

  • यासाठी पर्यायी मार्ग कोहिनूर चौक भगवान महावीर चौकातून डावीकडे वळून सर्वत्वाला चौक डावीकडे वळून बाबाजान चौक या चौक रस्त्याचा वापर करता येईल 

  • जेधे प्रसाद रस्ता सुभानशहा रस्ता पार्श्वनाथ चौक ते शास्त्री चौक सुभानशहा दर्गा ते सोन्या मारुती चौकापर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे 

  • यासाठी पर्यायी मार्ग पार्श्वनाथ चौकातून डावीकडे वळून सुभेदार तालीम चौक रस्त्याने सरळ शिवाजी रस्त्याने शिंदे आणि इच्छितस्थळी जाता येईल 

याबरोबरच शिवाजी रस्ता जिजामाता चौक ते गोटीराम भैय्या चौक मंडई ते शनिपार चौक बाजीराव रस्ता ते फुटका बुरुज पर्यंतचा रस्ता आणि आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतच्या रस्त्यांवर नो पार्किंग असणार आहे

Share This News
error: Content is protected !!