रशियन महिलेबरोबर रात्र घालवणं पडलं एक कोटी रुपयांना; हनी ट्रॅपची धक्कादायक घटना

162 0

रशियन महिलेबरोबर रात्र घालवणे निवृत्त अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. रशियन महिलेबरोबर या अधिकाऱ्याने घालवलेल्या वेळेत लपून-छपून काढण्यात आलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात आली. हा प्रकार मध्यप्रदेश मधील भोपाळ येथे घडला असून संबंधित अधिकारी हा भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) या नामांकित सरकारी कपंनीमधील निवृत्त अधिकारी आहे ‌

एका रात्रीचे 27 व्हिडिओ

ज्येष्ठ नागरिक असलेल्या या निवृत्त अधिकाऱ्याला रशियन महिलेशी भेट घालून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. काही दिवसांनी ही महिला व्यक्तीबरोबर एक रात्र राहिली. मात्र याच रात्रीत त्या दोघांचे लपून-छपून तब्बल 27 अश्लील व्हिडिओ काढण्यात आले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आली. बदनामीच्या भीतीने या व्यक्तीने या संपूर्ण टोळीला एक कोटी रुपये दिले.

एवढ्यावरच न थांबता या टोळीने सदर व्यक्तीला अनेकदा धमक्या देत वारंवार पैशाची मागणी केली. त्यामुळे अखेर या मागणीला कंटाळून या व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरू केला. मात्र रशियन महिला सगळी संपूर्ण टोळी सध्या फरार आहे. त्यामुळे संपूर्ण टोळीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!