CABINET DECISION: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते झाले मोठे निर्णय? वाचा सविस्तर

410 0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्य सरकार आता अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य महाविद्यालयासाठी जागा देणार आहे.

कोणते झाले निर्णय

✅ पुणे – छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार

✅ अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार

✅ शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य

✅ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान

✅ अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार

✅ औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते

✅थकीत देणी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ

✅ धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार

✅ काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय

✅ पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय

✅ हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा

Share This News
error: Content is protected !!