Crime

बँकेची परीक्षा देण्यासाठी निघाली होती, पण वाटेतच मृत्यूने गाठलं; नागपूरमधील अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

147 0

राज्यभरात अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातांमध्ये अनेक नागरिक आपला जीव गमावत आहेत. नागपूर मध्ये देखील अशीच एक धक्कादायक दुर्घटना घडली. नागपूरमध्ये बँकेची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या २६ वर्षीय तरूणीचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रियंका मानकर, असे या मृत तरूणीचे नाव आहे.

कसा झाला अपघात?

प्रियंका ती गेल्या अनेक दिवसांपासून बँकेच्या परीक्षेची तयारी करत होती. 3 जुलैला ती परीक्षा देण्यासाठी आपल्या भावाबरोबर दुचाकी वरून जात होती. दुचाकीच्या बाजूनेच भला मोठा ट्रक जात होता तर समोरून आणखी काही वाहने जात होती. त्यामुळे दुचाकीचे नियंत्रण बिघडले आणि दोघेही बहीण भाऊ खाली पडले. त्याचवेळी शेजारून जाणाऱ्या ट्रक खाली प्रियांका आली. ट्रकने चिरडल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिचा भाऊ योगेश हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या हाती आले असून या फुटेज मध्ये थर काप उडवणारी अपघाताची घटना कैद झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!