Beed:

पिंपरी चिंचवड हादरले ! लग्नाला नकार दिल्याने तरुणीची धारदार शस्त्राने हत्या; गुन्हे शाखेने आरोपीला ठोकल्या बेड्या

376 0

पिंपरी चिंचवड हादरले ! लग्नाला नकार दिल्याने तरुणीची धारदार शस्त्राने हत्या; गुन्हे शाखेने आरोपीला ठोकल्या बेड्या

गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमुळे खळबळजनक वातावरण तयार झाले आहेत. उरणमध्ये यशश्री शिंदे या वीस वर्षीय तरुणीची हत्या करून छिन्नविच्छिन्न अवस्थेत तिचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. तर दुसरीकडे नवी मुंबई बेलापूरमधील अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेवर मंदिरातील सेवेकर्‍यांनी लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून केला. या घटना ताज्या असतानाच आता आणखीन एक गंभीर घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड मधील एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राची ही सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरण इस्लामपूर या गावची रहिवासी होती. त्याच भागात राहणाऱ्या अविराज रामचंद्र खरात याचे प्राचीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र प्राचीने अविराजला लग्नाला नकार दिला. काही दिवसानंतर प्राची आंबेठाण परिसरात राहायला आली होती. अविराज च्या मनात प्राचीने लग्नाला नकार दिल्याचा राग होता. त्यामुळे या ठिकाणी येऊन त्याने प्राचीच्या पोटावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेच्या पथकाकडून आरोपीचा शोध सुरू होता. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणच्या जवळपासचे सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी अविराज खराता सांगलीकडे आपल्या मोटार सायकल वरून जाताना दिसला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून अविराजला बेड्या ठोकल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!