Monsoon News

IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

1810 0

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनची (IMD Monsoon Update) दमदार वाटचाल सुरू आहे, मान्सूननं सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग व्यापला आहे. राज्यातील उर्वरीत भागही मान्सून लवकरच व्यापणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

हवामान खात्याने दिला इशारा
पुढील 24 तासांसाठी हवामान खात्याकडून कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

Share This News
error: Content is protected !!