Vishal Agrawal

Pune Porsche Car Accident : ब्लड सॅम्पल कचऱ्यात टाकण्यासाठी विशाल अग्रवालने ‘इतके’ पैसे मोजले; समोर आला आकडा

1120 0

पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री भरधाव पोर्श कारखाली दोघांना चिडून मारल्यानंतर (Pune Porsche Car Accident) बिल्डर विशाल अग्रवालने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी केलेला कारनामा हळू हळू उघड होत आहे. पोलिस तपासामध्ये दिवसागणिक अग्रवाल फॅमिलीने केलेल्या कृत्यांचा आता उलघडा होताना दिसत आहे. पहिल्यांदा या प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता ते थेट ससून रुग्णालयामध्ये ब्लड सॅम्पल बदलून कचऱ्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयाचा फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी पैशाच्या बदल्यात ब्लड सॅम्पल बदलून कचऱ्यात फेकून दिल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. त्यामुळे ससून रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. इतकेच नव्हे, तर हा ब्लड सॅम्पल कचऱ्यामध्ये जाण्यासाठी विशाल अग्रवालने अजय तावरेशी संपर्क केल्याचे तांत्रिक पुराव्यातून उघड झालं आहे. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ब्लड सॅम्पल कचऱ्यामध्ये जाण्यासाठी विशाल अग्रवाल आणि डॉक्टरांमध्ये पैशांचे दिवाण-घेवाण सुद्धा झाली होती. वडगाव शेरीतून 3 लाख रुपये स्विफ्ट कारमधून घेऊन येणाऱ्या ससूनमधील शिपायाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. अमित घटकांबळे असं त्याचं नाव असून तो ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन विभागामध्ये शिपाई म्हणून काम करतो. त्यामुळे पैशांच्या बदल्यांमध्ये ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल थेट कचऱ्यामध्ये टाकून दिल्याचे स्पष्ट झालं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Johnny Wactor : खळबळजनक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या

Maharashtra Rain Alert : एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे महाराष्ट्रावर घोंगावतंय ‘हे’ संकट; IMD कडून हायअलर्ट जारी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डंपरने झोपेत असलेल्या कामगारांना चिरडले

Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर

Pune Porshe Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; ‘ही’ व्यक्ती दाखल करणार तक्रार

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी

Maharashtra Politics : विधान परिषदेसाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणा; राज ठाकरेंनी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

Pune Porsche Car Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!