मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण अजूनही संपलेलं नाही. सलमान खान गोळीबार प्रकरण ताज असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जॉनी व्हॅक्टर असं अभिनेत्याचं नाव आहे. लॉस एंजेलिसमध्ये जॉनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जॉनीच्या मृत्यूनंतर हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी सकाळी 3 वाजता जॉनीवर हल्ला झाला.ज्यात त्याची हत्या करण्यात आली आहे. काही चोरटे घुसले आणि त्यांनी जॉनीच्या कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याचा प्रयत्न केलं. जॉनीनं ते पाहिलं आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात चोरांनीं जॉनीची गोळ्या घालून हत्या केली अशी माहिती अभिनेता जॉनीची आई स्कारलेट यांनी दिली आहे.
अभिनेता जॉनीच्या मृत्यूनंतर हॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्याचा मृत्यू अत्यंत धक्कादायक होता. वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी जॉनीचा मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक हॉलिवूड कलाकार आणि चाहत्यांनी जॉनीला श्रद्दांजली वाहिली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डंपरने झोपेत असलेल्या कामगारांना चिरडले
Pune Porsche Car Accident : वेदांत अग्रवालचा पार्टीच्या अगोदरचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर
Pune Porshe Accident : अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; ‘ही’ व्यक्ती दाखल करणार तक्रार
Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर; मुलींनी पुन्हा एकदा मारली बाजी