Sanjay Raut

Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

528 0

मुंबई : “भाजपा व त्यांचे मित्रपक्ष मिळून बहुमताच्या आसपास पोहोचत नाहीत व इंडिया आघाडीस तीनशेच्या जवळपास जागा मिळत आहेत,” असं भाकित उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे. “मोदींचे सरकार जात आहे. त्यामुळे परदेशी उद्योगपतींनी साधारण सवा लाख कोटींची गुंतवणूक मागे घेतली. नव्या सरकारबरोबर नवा करार करू असे या सगळ्यांचे म्हणणे आहे,” असा दावा राऊत यांनी केला आहे.

राऊत इतक्यावरच थांबले नाहीतर मोदी सरकारच्या काळात परदेशातील भारतीय गुंतवणूक वाढली असून हा सर्व काळा पैसा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राऊत यांनी नितीन गडकरींचा नागपूरमध्ये पराभव करण्यासाठी मोदी आणि शहांनी प्रयत्न केल्याचाही दावाही केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!