मुंबई : राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. अशात आता आजही अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून (Weather Update) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा तसंच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला हायअलर्ट
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
कोकणातही आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग इथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, संध्याकाळी इथेही हलका पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Suicide News : खळबळजनक ! सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची मध्यरात्री आत्महत्या
Crime News : शेतात काम करताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Monsoon Update : महाराष्ट्रात कधी येणार मान्सून? हवामान विभागाने दिला ‘हा’ अलर्ट