Suicide News

Suicide News : खळबळजनक ! सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची मध्यरात्री आत्महत्या

696 0

मुंबई : क्रिकेटचे देव तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने काल मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide News) केली आहे. प्रकाश गोविंदा कापडे (वय 37) असे आत्महत्या करणाऱ्या बॉडीगार्डचे नाव आहे. जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगरमध्ये ते वास्तव्यास होते.

काय घडले नेमके?
प्रकाश कापडे हे SRPF मध्ये भरती झाले होते. त्यानंतर त्यांची पोस्टिंग होऊन ते मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचे बॉडीगार्ड म्हणून कर्तव्यावर होते. आठ दिवसांपासून कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते. रात्री 1 वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. यावेळी घरातील सर्व झोपले होते. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर घरातील लोक धावत आले तेव्हा प्रकाश हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर प्रकाश कापडे यांचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला मात्र त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपासात याचे कारण स्पष्ट होईल. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Crime News : शेतात काम करताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Monsoon Update : महाराष्ट्रात कधी येणार मान्सून? हवामान विभागाने दिला ‘हा’ अलर्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!