Vijay-Wadettiwar

Vijay Wadettiwar : ‘हेमंत करकरेंना कसाबने नाही तर भाजप समर्पित पोलिसाने गोळी मारली’; विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाने खळबळ

442 0

चंद्रपूर : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच सर्वच राजकीय नेते एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. असाच एक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. ज्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. महायुतीचे उत्तर मध्य मुंबईतील निवृत्त सरकारी वकील ॲड‌. उज्वल निकम यांच्यावर वडेट्टीवार यांनी अतिशय गंभीर आरोप केला आहे.

ॲड‌. उज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या उमेदवार आहेत. पण निष्ठावंत पूनम महाजन यांना डावलून उज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यामुळे विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात आहे. विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उज्वल निकम हे देशद्रोही आहेत. 26/ 11 चा हल्ला झाला त्यावेळी पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर अतिरेकी कसाब याने गोळ्या झाडल्या नसून मुंबई पोलिसातीलच एका भाजपला समर्पित असलेल्या पोलिसाने त्यांच्यावर गोळी झाडली. आणि याबाबतीतले सर्व पुरावे त्यावेळी उज्वल निकम यांनी लपवून ठेवले त्यामुळे ते देशद्रोही आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. सध्या तरी या आरोपावर उज्वल निकम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र भाजपने यावर प्रतिउत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांच्या या विधानावर प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, उज्वल निकम हे देशभक्त आहेत. त्यांना भाजपने उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस त्यांची बदनामी करत आहे. याचाच अर्थ काँग्रेसला मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबची जास्त काळजी आहे. म्हणूनच ते कसाब सारख्या दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे राहतात. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपावरून सध्या राज्यातील वातावरण तापताना दिसून येत आहे. अनेक राजकीय नेते या विधानावर आपापली भूमिका मांडत आहेत. मात्र उज्वल निकम यांनी अद्याप प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सुविधांची उभारणी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

T20 World Cup 2024 : टी – 20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर

Thane News : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या स्वीय सहाय्यकाचा भीषण अपघात

Parbhani Crime : महाराष्ट्र हादरला ! प्रेमाला विरोध करत आई-वडिलांनी पोटच्या लेकीची केली हत्या

Maharashtra Politics : ‘फडणवीसांविरोधात रचण्यात आला होता कट’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

Manifesto : बीबीसी न्यूज मराठीचा महिलांसाठीचा ‘ती’चा जाहीरनामा प्रकशित

KPK Jeyakumar : खळबळजनक ! 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचा आढळला मृतदेह

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide