Sangli Loksabha : सांगलीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट ! ‘या’ नाराज काँग्रेस नेत्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

446 0

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या (Sangli Loksabha) तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील जागांवर महाराष्ट्रात मतदान होणार आहे. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होणार आहे. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस होती. काँग्रेस या जागेसाठी आग्रही होतं मात्र शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम प्रयत्नशील होते.

विश्वजीत कदमांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
शेवटपर्यंत विशाल पाटील यांना काँग्रेसकडून तिकीट दिलं गेलं नाही. आता या घडामोडीनंतर चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी विश्वजीत कदम यांनी भेटीगाठीही सुरू केल्या. दरम्यान, विश्वजीत कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची कोल्हापुरात भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची विश्वजीत कदम यांच्यासोबत दोन तास चर्चा झाली. दरम्यान, शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विश्वजीत कदम यांनी सांगलीत मविआच्या उमेदवाराविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे माफी मागितल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’तर्फे वेद विज्ञान महाविद्यापीठास स्कूल बस भेट

Accident News : कराड चिपळूण महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात झाली गॅस गळती

Loksabha : भाजपमध्ये जाण्यासाठी ‘ते’ दोन नेते रोज शरद पवारांना फोन करायचे; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा गौप्यस्पोट

Loksabha : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीवर भाजपकडून आक्षेप

Nashik News : हृदयद्रावक ! सख्ख्या बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू

Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला

Share This News
error: Content is protected !!