Breaking News
Anis Sundke

Pune News : हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुसलमानांचा सुद्धा आहे : अनिस सुंडके

448 0

पुणे : सर्वधर्म समभाव असणारा आपला भारत देश कधीही धार्मिक किंवा जातीय राजकारणाचा भाग झाले नाहीत. पण आता देशात (Pune News) हिंदू मुसलमान असा भेदभाव केला जातो जो चुकीचा आहे. हा देश जितका हिंदूंचा आहे तितकाच मुसलमानांचा सुद्धा आहे असे प्रतिपादन एमआयएम चे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडके यांनी केले आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात प्रचार सभा झाल्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा विरोध करून अनिस सुंडके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके म्हणाले कि, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पुण्यात आले होते. त्यांनी मुस्लिम ओबीसी आरक्षणाबाबत वक्तव्य केले, की ओबीसी आरक्षणावर मुस्लिमांनी डाका घातलेला आहे. आणि हे सर्व कर्नाटकात काँग्रेसच्या सरकारने केलं असल्याचं त्यांनी म्हटले आहे. पण मी हे सांगू इच्छितो की हा हिंदुस्थान जितका हिंदूंचा आहे तितकाच मुसलमानांचा सुद्धा आहे हे पंतप्रधान पदी विराजमान असलेल्या मोदींनी लक्षात घेतलं पाहिजे.

सत्तेत जितका हिंदूंचा अधिकार आहे तितकाच मुसलमानांचा सुद्धा अधिकार आहे. त्यामुळे यनिमित्ताने मी माझ्या मुसलमान बांधवांना सांगू इच्छितो की, पंतप्रधानांना कोणतेही काम राहिलेलं दिसत नाही त्यांना कोणतेही विकासाचे काम सांगू वाटत नाही. फक्त हिंदू आणि मुसलमान या दोन धर्माच्या लोकांमध्ये भांडणे लावण्यात हे धन्यता मानतात. त्यामुळे या निमित्ताने मी सांगू इच्छितो कि, या देशावर जितका हिंदूंचा हक्क आहे तितकाच मुसलमानांचा सुद्धा हक्क आहे.”

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Yamini Jadhav : दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर

Pimpri Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये गावगुंडांची दहशत; अनेक वाहनांची केली तोडफोड

Pimpri-Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये भारतीय सैन्य दलाच्या वाहनाचा भीषण अपघात

T20 World Cup : T20 World Cupसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूंचे झाले कमबॅक

Amit Shah : मोठी कारवाई ! अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात 2 जणांना अटक

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या?

Ajit Pawar : PM मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; 1 मेपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News
error: Content is protected !!