Shantigiti Maharaj

Shantigiti Maharaj : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी ‘या’ पक्षाकडून भरला उमेदवारी अर्ज

488 0

नाशिक : नाशिकच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नाशिकमधून स्वामी शांतिगिरी महाराजांनी (Shantigiti Maharaj) शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. या ठिकाणी महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

या मतदार संघातून छगन भुजबळ यांनी अगोदरच माघार घेतली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे नाशिक लोकसभेसाठी इच्छुक आहेत. यादरम्यान आता शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

कोण आहेत शांतिगीरी महाराज?
वेरुळ मठाचे मठाधिपती असलेले शांतिगिरी महाराज हे अनेक वर्षांपासून अध्यात्माशी जोडले गेले असले तरीही ते राजकारणाशी देखील जोडलेले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. शांतिगिरी महाराज यांनी छ. संभाजीनगरमधून 2009 ची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल 1 लाख 42 हजार मतं देखील मिळवली होती. शांतिगिरी महाराज यांचे प्रामुख्याने काम हे शिक्षण क्षेत्र आणि व्यसनमुक्ती यामध्ये आहे. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे तब्बल 38 कोटी 81 लाख 53 हजार 339 रुपयांची संपत्ती असून ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.शांतिगिरी महाराजांना मानणारा मोठा वर्ग सध्या नाशिकमध्ये आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Srinivasa Prasad : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व्ही.श्रीनिवास प्रसाद यांचे निधन

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार

Pune Crime News : धक्कादायक ! स्वारगेट परिसरात आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Narendra Modi : 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या होणार 6 सभा

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Share This News
error: Content is protected !!