Devendra Fadanvis Tension

Solapur News : भाजपला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

408 0

सोलापूर : सोलापूरच्या (Solapur News) राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. मोहोळ तालुक्यातील गेल्या 25 वर्षापासून भाजपात असणारे संजय क्षीरसागर यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभा लढवली आहे. क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. क्षीरसागर यांच्या पक्ष प्रवेशाने सोलापूर लोकसभा मतदार संघात प्रणिती शिंदे यांना मोठा फायदा होणार आहे.

2014 ला संजय क्षिरसागर यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. संजय क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भाजपत गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली, त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं संजय क्षीरसागर म्हणाले आहेत.

मोहोळ तालुका 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीच्या याच बालेकिल्ल्यात नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे भाऊ संजय क्षीरसागर यांनी कधी शिवेसना तर कधी भाजपकडून राष्ट्रवादीला आव्हान दिलं. संजय क्षीरसागर 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर लढले. तेव्हा 8 हजार मतांच्या फरकाने ते पराभूत झाले होते. राष्ट्रवादीत फुटीनंतर मोहोळमधील नेते अजित पवार गटासोबत गेले आणि ज्यांच्या विरोधात लढले तेच पुन्हा भाजपसोबत आल्यानं श्रीरसागर बंधू नाराज झाले. शेवटी त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय़ घेतला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nagpur News : आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान; शिक्षण विभागाला लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश

Pune News : संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट; भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

Ruturaj Gaikwad : धोनीला ‘जे’ 17 वर्षांत जमलं नाही ‘ते’ ऋतुराजने पहिल्याच वर्षांत केले

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!