Jyoti Mete

Dr.Jyoti Mete : डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

492 0

बीड : शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे (Dr.Jyoti Mete) यांनी बीड लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मी लोकसभा निवडणूक लढणार अशी भूमिका घेतली होती. त्या बीड लोकसभा मतदाससंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे.

काय म्हणाल्या ज्योती मेटे?
आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन मी निवडणूक लढणार नाही, अशी भूमिका डॉ. ज्योती मेटे यांनी जाहीर केली. त्या लोकसभेसाठी इच्छुक होत्या यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेटदेखील घेतली होती. मात्र शरद पवार यांनी बीड लोकसभेसाठी बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिल्याने ज्योती मेटे नाराज झाल्या होत्या. यानंतर आता शिवसंग्राम प्रदेश कार्यकारणीसोबत चर्चा करून लोकसभा निवडणुकीविषयी कोणासोबत जायचं? याचा निर्णय घेणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे रंगणार सामना
बीड लोकसभेसाठी महायुतीकडून पंकजा मुंडे यांना तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बीडमध्ये महायुती विजयी होते की महाविकास आघाडी बाजी मारते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nilesh Sable : नवा कॉमेडी शो सुरु होण्याआधी निलेश साबळेची ‘ती’ पोस्ट होते व्हायरल!

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 60 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

Pune News : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; बैलगाड्याची धडक लागून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग

Uddhav Thackeray : आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो फडणवीसांनी शब्द दिला होता; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!