nilesh sabale

Nilesh Sable : नवा कॉमेडी शो सुरु होण्याआधी निलेश साबळेची ‘ती’ पोस्ट होते व्हायरल!

997 0

मुंबई : लोकप्रिय अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक निलेश साबळेंचा नवा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. 27 एप्रिलपासून हा नवा शो सुरू होणार असून निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने यामधून हे त्रिकुट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निलेश साबळे याने चला हवा येऊ द्या हा शो सोडल्यानंतर त्याचा नवा कॉमेडी शो 27 एप्रिल पासून कलर्स मराठीवर प्रदर्शित होणार आहे.

नवा शो सुरू होण्याआधी निलेश साबळेने एक खास पोस्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये नव्या शोच्या पहिल्या एपिसोडच्या शुटींग दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की “नवीन सुरूवात करतोय.. तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा असू द्या…!”. या व्हिडीओमध्ये निलेश साबळे दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांचे आशिर्वाद घेताना दिसत आहेत.

मराठी सिनेमांचे दमदार प्रमोशन करण्यासाठी चला हवा येऊ द्या हा एक दर्जेदार प्लॅटफॉर्म मागील 10 वर्ष चालू होता. निलेश साबळे आणि टीमने चला हवा येऊ द्या शो चा निरोप घेत हस्ताय ना हसायलाच पाहिजे या नवीन शो मधून नवा प्रवास सुरु करणार आहे.

या नवीन कॉमेडी शो मध्ये डॉ. निलेश साबळे सोबतच भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे विनोदसम्राट या शो च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. “हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” या कॉमेडी शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण जबाबदारी डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहेत. भाऊ कदम आणि ओंकार भोजनेसोबतच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकार देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोचा पॅटर्न नेमका कसा असणार आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. हा शो चला हवा येऊ द्या एवढा प्रतिसाद मिळवण्यात यशस्वी होतोय का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 60 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

Pune News : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; बैलगाड्याची धडक लागून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग

Uddhav Thackeray : आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो फडणवीसांनी शब्द दिला होता; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Share This News
error: Content is protected !!