Pune News

Pune News : बैलगाडा शर्यत बेतली जीवावर; बैलगाड्याची धडक लागून वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

508 0

पुणे : पुण्यातील (Pune News) भोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोरमध्ये जनाईदेवी आणि रामनवमीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैलगाडा शर्यतीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये शर्यत पाहण्यासाठी आलेल्या एका वृद्ध व्यक्तीला बैलगाड्याची धडक लागल्याने आपला जीव गमवावा लागला आहे.

भोरची ग्रामदेवता जनाईदेवी आणि रामनवमीच्या उत्सवानिमित्त सोमवारी एसटी स्टँडजवळील नवलाई माता मंदिराच्या समोरील शेतामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. सेमीफायनलची बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा गर्दीत घुसला आणि ही दुर्घटना घडली.

विष्णू गेनबा भोमे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बैलगाड्याची धडक बसल्यान भोमे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. त्यांनतर त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग

Uddhav Thackeray : आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो फडणवीसांनी शब्द दिला होता; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Share This News
error: Content is protected !!