Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभेमधून माघार

338 0

नाशिक : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक लोकसभेमधून माघार घेतल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. त्यामुळे आता कुठेतरी नाशिक लोकसभेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभेसाठी होती रस्सीखेच
नाशिक लोकसभेसाठी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सुरु होती. या मतदारसंघातून शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. मात्र या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.

हेमंत गोडसेंनी मानले आभार
छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेमधून माघार घेतल्याने शिंदे गटाचे नेते व विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आभार मानले आहेत. त्यामुळे आता ही जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजेना उमेदवारी
महाविकास आघाडीकडून ही जाग ठाकरे गटासाठी सोडण्यात आली होती. या ठिकाणी ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभेसाठी राजाभाऊ वाजेना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) विरुद्ध हेमंत गोडसे ( शिंदे गट) असा सामना पाहायला मिळू शकतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Loksabha : पुण्यात ‘या’ दिवशी होणार मोदींची जाहीर सभा

Pune News : ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन

Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई होणार? ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!