Breaking News

पिंपरी चिंचवडमध्ये भीषण आगीत सात ते आठ कंपन्या खाक

522 0

पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरातील सोनवणे वस्ती इथं एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत जवळपास सहा ते सात कंपन्या पूर्णपणे खाक झाल्या आहेत. ही घटना आज दोन वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचू न शकल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ही आग अन्य कंपन्यात पसरल्याचे आरोप स्थानिकांनी केला आहे.

चिखली येथील सोनवणे वस्ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत. आज दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान सुरुवातीला एका कंपनीला आग लागली. मात्र अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचू न शकल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आणि पाहता पाहता सहा ते सात कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून १० बंबांच्या आगीवर नियंत्रण मिळवले. उन्हाळ्यात चिखली परिसरात वारंवार आगीच्या घटना घडत असतात. मात्र या भागात अग्निशमन केंद्र नसल्याने वेळेत आगीवर नियंत्रण मिळवता येत नाही त्यामुळे चिखली इथं अग्निशमन केंद्र तातडीने सुरु करण्यात यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!