पुणे : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते राष्ट्रवादीकडून उमेदवार असतील. मात्र यात पक्षप्रवेशापुर्वी आढळराव पाटलांनी एक मोठे विधान केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही माझ्या हातात शिवबंधन कायम बांधलेलं असेल, असं ते म्हणाले आहेत.
महाविकासआघाडी सरकारच्या काळात मी अजित पवारांवर नव्हे तर उद्धव ठाकरेंवर टीका करायचो असा दावा आढळरावांनी केला आहे. आजचा प्रवेश ही घरवापसी अथवा लोकसभेच्या अनुषंगाने पर्याय नाही. तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हे आम्ही उचललेल पाऊल आहे. असं म्हणत अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचं अजित पवारांनी दिलेलं आव्हान मी माझ्या खांद्यावर उचललं आहे, असा विश्वास आढळरावांनी यावेळी व्यक्त केला.
2004 साली राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. 20 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं. त्यानंतर आता पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश घेणार आहात ही घरवापसी आहे का?, असं विचारल्यावर ही घरवापसी नाही आणि मी पक्ष बदलणाऱ्यातला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 20 वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश करेपर्यंत प्रामाणिक राहिलो, असंही ते म्हणाले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : ‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार’ चेतन चावडा यांना प्रदान
Lok Sabha Election : विदर्भातील ‘या’ 5 जागांवर होणार रंगतदार लढती
Maharashtra Politics : पवारांचं टेन्शन वाढलं ! शिवतारेंनंतर आता ‘हा’ नेता लढवणार बारामती लोकसभा
Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू