Amravati Accident

Amravati Accident : अमरावतीत कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

655 0

अमरावती : अमरावतीमधून (Amravati Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये कारचं टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं अमरावतीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही कार अकोल्याहून अमरावतीला जात होती. या दरम्यान हा अपघात झाला.

काय घडले नेमके?
ही कार अकोल्याहून अमरावतीला निघाली होती. याचदरम्यान भातकुली गावाच्या परिसरात भरधाव कारचे टायर फुटल्यानं हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे. तसेच या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमी व्यक्तींना उपचारासाठी अमरावतीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

कलीम खान सलीम खान (वय 36), सलीम खान मेहमूद खान (वय 65) आणि रुबीना परविन कलीम खान (वय 32) असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर रिजवान, नदीम, जारा परवीन ही तीन मुलं आणि मोहम्मद शकील हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Phalakasana : फलकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!