Eknath Khadse and raksha khadse

Eknath Khadse : सुनबाईपुढे माघार? रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत खडसेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

465 0

रावेर : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास 100 उमेदवारांची (Eknath Khadse) यादी जाहीर केली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातून अनेपक्षित नावांची घोषणा करण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला. यानंतर सासरे आणि सून अशी लढत होणार असे वाटत असताना रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?
रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून रावेर लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. रावेरमधून एकनाथ खडेस यांचे नाव चर्चेत होते. मात्र, प्रकृतीचे कारण देत एकनाथ खडसे यांनी रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास एकनाथ खडसे यांनी नकार दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या मतदार संघात कोणला उमेदवारी देणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बहुचर्चित रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे विरूद्ध खडसे लढत होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. प्रकृतीच्या कारणानं आपण निवडणूक लढवणार नसल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय. तसंच मुलगी रोहिणी खडसेही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना घरातून आव्हान मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. रावेरची जागा राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे आहे. पवारांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची बैठक घेतली. उद्यापर्यंत उमेदवार ठरवण्यात येईल अशी माहिती खडसेंनी दिली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ramdas Kadam : ‘उद्धव ठाकरेंना कानफाटीत…’; रामदास कदम यांचे मोठे विधान

Vijay Shivtare : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा अजित पवारांना विरोध कायम; केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Pune News : पुण्याच्या जुन्नरमध्ये एकाचवेळी आढळले 3 बिबटे; धक्कादायक Video आला समोर

Loksabha Election : उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार

Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी आज अंतिम मुदत

Jalgaon News : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग

Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!