Amit Thackeray

Vasant More : अमित ठाकरेंचा ‘तो’ घाव वसंत मोरेंच्या जिव्हारी लागला अन् तोच ठरला टर्निंग पॉईंट

963 0

पुणे : मनसेचे पुण्यातील माजी नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात या गोष्टीचा जोरदार चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांनी पक्ष सोडताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुणे मनसेच्या कार्यकारिणीतील नेत्यांना लक्ष्य केले होते. या नेत्यांनी सातत्याने गटबाजी करुन आपल्याला डावलले. या सगळ्याला कंटाळूनच आपण मनसे सोडल्याचे वसंत मोरे म्हणाले. मात्र काही लोकांचे असे म्हणणे आहे कि वसंत मोरे यांनी पक्ष सोडण्यासाठी दिलेले कारण म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यात घडलेली एक घटना वसंत मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने कारणीभूत ठरली. त्यावेळी नेमके काय घडले होते जाणून घेऊया…

नेमकं काय घडलं होतं?
वसंत मोरे यांनी अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. एरवीही वसंत मोरे हे सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. परंतु, वसंत मोरे यांनी 27 फेब्रुवारी रोजी लिहलेल्या फेसबुक पोस्टमध्ये मनसेच्या पुण्यातील नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला होता. हीच गोष्ट अमित ठाकरे यांना खटकली होती. यावरुन त्यांनी वसंत मोरे यांना, ‘सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा’, असा सल्ला दिला होता. त्यामुळे वसंत मोरे दुखावल्याचे सांगितले जाते.

वसंत मोरेंनी काय लिहिले होते पोस्टमध्ये?
‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर यशस्वी असा मोर्चा झाला आणि संध्याकाळी अमितसाहेबांचा मला फोन आला होता. ते म्हणले आजचा मोर्चा खूप छान झाला. मला समजलं तुम्हीही खूप कार्यकर्ते घेऊन आला होता. पण मला तुम्ही दिसला कसे नाही, भेटला कसे नाही… मी साहेबांना बोललो, साहेब मी तुमच्या अवतीभवती होतो त्याचा हा पुरावा… साहेब मी काम करणारा आहे, नुसता मिरवणारा नाही. त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल. मी तुमच्या मागे अगदी दोनच पावलं चालतो होतो, असो मी कायमच तुमच्या पाठीमागे असेल… अमितसाहेब तुमच्यासाठी काहीपण फक्त मला समजून घ्या’, असे वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting : आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

Lok Sabha Elections : ‘आता शिंदे राजीनामा देणार का?’ ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याने मुख्यमंत्र्यांना डिवचलं

Ellyse Perry : एलिस पेरीने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच महिला क्रिकेटपटू

Vijay Shivtare : महायुतीला धक्का! विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम, म्हणाले..

Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरेंच्या घोषणांमुळे मविआमध्ये धुसफूस; आंबेडकरांच्या ‘त्या’ पत्राने वाढवलं टेन्शन

Punit Balan : ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात झाला करार

Accident Video : मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं IPS अधिकाऱ्याला चिरडलं; Video आला समोर

Ustrasana : उष्ट्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे ?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!