मुंबई : महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) लोकसभा जागा वाटप अद्याप जाहीर झालं नाही. काही जागांवरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे जागा वाटप रखडलं असतानाचं दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एका पाठोपाठ एक दोन लोकसभा मतदार संघातील उमेदवारींची नावं जाहीर केली आहेत. सोमवारी उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. सांगलीतून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी दोन लोकसभा मतदार संघातील उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे, कारण सांगली लोकसभेवर काँग्रेसनं दावा केला होता. मात्र सोमवारी उद्धव ठाकरेंनी परस्पर सांगलीत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. एकीकडे काँग्रेस ठाकरेंच्या घोषणेवर नाराज आहे, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
आंबेडकरांनी काय लिहिले पत्रामध्ये?
लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. या किंवा पुढच्या आठवड्यात निवडणूक जाहीर होऊ शकते. महाविकास आघाडीनं आपापसात जागावाटपाचं समीकरण निश्चित केलं नाही. मी आघाडीबाबत सकारात्मक आहे. पण जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेची बाब आहे. काँग्रेस शिवसेना (उबाठा) मध्ये किमान 10 जागांवर तर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (उबाठा) मध्ये 5 जागांवर समन्वयाचा अभाव आहे. शिवसेना (उबाठा) नं गेल्यावेळी जिंकलेल्या 18 जागांवर दावा केला आहे. त्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी चिंता व्यक्त केली आहे. जागावाटपावर लवकरात लवकर चर्चा करावी, अशी सूचना प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. एवढच नाही तर संजय राऊतांच्या विश्वासर्हतेवर प्रकाश आंबेडकरांनी सवाल उपस्थित केला आहे. तर संजय राऊतांनी आंबेडकरांच्या आरोपाचं खंडन केलं आहे. ‘संजय राऊत मीडियाशी खोटं ब्रिफिंग करतात, की वंचितने आमच्याकडे जागाच मागितल्या नाहीत’, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
संजय राऊतांनी काय दिले प्रत्युत्तर?
प्रकाश आंबेडकरांच्या या आरोपांवर राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. ‘मी कधीच खोटं बोलत नाही. संजय राऊत नेहमीच सत्य बोलतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. या देशातील हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर बरोबर पाहिजेत. महाविकासआघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना 4 जागांचा प्रस्ताव आहे. त्यांची भूमिका माहिती नाही, मात्र ते आमच्यासोबत राहिले पाहिजेत ही आमची भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर खोटं बोलतात, असं मी कधीच म्हणणार नाही. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत’, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Punit Balan : ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात झाला करार
Accident Video : मंत्र्याच्या ताफ्यातील वाहनानं IPS अधिकाऱ्याला चिरडलं; Video आला समोर