Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser : ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित!

785 0

मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा (Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser) चांगलाच तापला आहे. यामुळे राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटातून मांडली जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. 26 एप्रिल रोजी ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे,नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत,शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलीआहे. डॉ.सुधीर निकम यांनी या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा केली आहे.

चित्रपटात ‘या’ कलाकारांनी साकारली महत्वाची भूमिका
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके,यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर

Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide