Rinku Rajguru

Rinku Rajguru : सैराट फेम रिंकू राजगुरुला धक्काबुक्की; Video आला समोर

782 0

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरुला (Rinku Rajguru) नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. सिनेमाचं शुटींग नसेल त्या वेळात रिंकू अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. अनेक ठिकाणीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील रिंकू राजगुरू हजर असते. अशातच नुकताच जळगाव येथे शासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवात अभिनेत्री रिंकू राजगुरूनं हजेरी लावली होती. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला मात्र या कार्यक्रमात रिंकू राजगुरुला धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर रिंकू चांगलीच भडकली तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
जळगावमधील सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्यक्रमानंतर रिंकूला भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. कार्यक्रमातून बाहेर येत असताना चाहत्यांनी रिंकू भोवती गर्दी केली. तिच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले. गर्दी दरम्यान रिंकू राजगुरुला धक्काबुक्की झाली.या प्रकारानंतर रिंकू राजगुरु चाहत्यांवर चांगलीच भडकली. “तुमच्या मुलीला कोणी धक्काबुक्की केल्यास तुम्हाला चालेल का? ” अशा शब्दात रिंकू राजगुरूने चाहत्यांना खडेबोल सुनावले. रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाल्यास नुकताच तिचा झिम्मा 2 हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात रिंकूनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Traffic Diversion : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उद्यापासून पुण्यात अवजड वाहनांना बंदी

Latur Accident : लातूर-नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात; देवदर्शनासाठी निघालेल्या 4 जणांचा मृत्यू

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!