NCP

NCP : …तोपर्यंत ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ नाव कायम राहणार; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

681 0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला, यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवे नाव देण्यात आले. आज या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहे. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने नेमके काय म्हंटले जाणून घेऊया…

…तोपर्यंत ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ नाव कायम राहणार
सुप्रीम कोर्ट या याचिकेची सुनावणी करू इच्छिते, दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसंच या प्रकरणाची सुनावणी तीन आठवड्यांनंतर होईल, याचिकाकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार वापरण्याचा अधिकार पुढच्या आदेशापर्यंत कायम राहील, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. तसंच याचिकाकर्ता चिन्ह वाटपासाठी निवडणूक आयोगाकडे संपर्क साधू शकतो. अर्ज दाखल केल्यानंतर एका आठवड्याच्या आत निवडणूक चिन्हाचं वाटप केलं जाईल, असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहे.

शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. निवडणूक होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हेच नाव कायम राहू दे, अशी मागणी शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांच्याकडून करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी घेताना निवडणूक आयोगाने पुढील आदेशापर्यंत हेच नाव कायम ठेवायला सांगितलं आहे, त्यामुळे हा शरद पवार गटाला दिलासा मिळाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय टोळीकडून साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त

Pune Crime Video : पुण्यातील खराडी परिसरात टोळक्याकडून गाड्यांच्या जाळपोळीसह महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Hemant Godse Car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात

Pune News : शिवनेरीच्या पायथ्याजवळ लावण्यात आलेले पीएम मोदी, सीएम शिंदेंचे पोस्टर फाडले; 5 जणांना अटक

Shivaji Maharaj Jayanti : शिवजयंती वर्षातून 2 वेळा का साजरी होते?

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide