पुण्यातील शेवटच्या कोरोना रूग्णाला ‘नायडू’ मधून डिस्चार्ज

141 0

पुणे – दोन वर्षापूर्वी राज्यात सर्वात प्रथम पुण्यात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली होती. आता पुण्यातील महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शेवटच्या कोरोना रुग्णाला रूग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ संजीव वावरे यांनी सांगितले की, पुणे शहरातील नायडू रुग्णालयात उपचार घेणारा शेवटचा कोरोना रूग्ण बरा झाला असून त्याता रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता शहरातीत एकाही सरकारी रुग्णालयात एकही कोरोना रूग्ण दाखल नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्या शहरात कोरोनाचे एकूण 98 सक्रीय रुग्णांनी नोंद असून हे सर्व होम क्वारंटाईनमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 18 एप्रिल 2020 रोजी 56 हजार 650 रुग्णांची नोंद करण्यात आली होती . तर 22 जानेवारी 2022 रोजी एका दिवसात सर्वाधिक 8,000 रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर जानेवारी 2022 मध्ये एका महिन्यात सक्रीय रूग्णसंख्या 54 हजारांवर पोहचली होती. अशी माहिती डॉ. वावरे यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!