अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला, 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

207 0

मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या अनिल देशमुख कोठडीत आहेत.

गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने दरमहा 100 कोटींच्या वसूली प्रकरणी सचिन वाझे, संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि अनिल देशमुख या चौघांचा ताबा घेण्याची परवानगी तपास यंत्रणेला दिली होती. त्यानुसार सीबीआयने सचिन वाझेसह पालांडे आणि शिंदे या देशमुखांच्या दोन सहाय्यकांना सोमवारी (4 एप्रिल) सीबीआयकडून अटक करण्यात आली.

अटकेनंतर या तिघांनाही मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टापुढे हजर केलं असता कोर्टाने या तिघांना सात दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिल देशमुख अचानक दोन दिवसांपूर्वी आर्थर रोड कारागृहातील स्वच्छतागृहात घसरून पडल्याने त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. कारागृह प्रशासनाने त्यांची जे. जे. रुग्णालयात तपासणी केली. त्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे सीबीआय त्यांचा ताबा घेऊ शकली नाही.

मंगळवारी (5 एप्रिल) देशमुखांना डिस्चार्ज दिल्याने सीबीआय ताबा घेण्याआधीच देशमुखांनी त्याविरोधात हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु या याचिकेवरील सुनावणीआधीच सीबीआयने आर्थर रोड तुरुंगातून अनिल देशमुख यांना ताब्यात घेतले. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना
11 एप्रिलपर्यंत CBI कोठडी देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

एकल वापर प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करणार ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Posted by - October 20, 2022 0
मुंबई : राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे…

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांना मातृशोक

Posted by - July 13, 2022 0
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे सहकारी असलेले आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या…

ठाकरे सरकार राज ठाकरे यांना अटक करणार का ? गृहमंत्र्यांसोबत आज बैठक

Posted by - May 3, 2022 0
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत मशिदीवरील भोंगे यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर चार मे पर्यंतचा भोंगे उतरवण्यासाठी…
Pune Crime

Pune Crime : पुण्यात बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट; दोन गटांत झाला तुफान राडा

Posted by - September 29, 2023 0
पुणे : राज्यात कालपासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना दिसत…
Chandrapur Accident Crime

Chandrapur Accident Crime : चंद्रपूर झालं सुन्न ! घरापासून हाकेच्या अंतरावर असताना कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Posted by - August 14, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरमधून (Chandrapur Accident Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Chandrapur Accident Crime) ट्रकनं धडक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *