पुणे- शहरातील धनकवडी भागांमध्ये कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगर मधून धिंड काढली. या गुंडांमुळे नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर व्हावी तसेच या गुंडाना कायद्याची जरब बसावी यासाठी पोलिसांनी त्यांना परिसरातून फिरवले. या गुंडांनी काही जणांना मारहाण केल्याचे व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून आज त्यांची बालाजीनगर मधून वरात काढली.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/watch/?v=1006052326694343&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing