आपला महाराष्ट्रठळक बातम्या

एसटी विलीनीकरणाबाबत आज निर्णय शक्य? न्यायालयात सुनावणीला सुरूवात

मुंबई- गेल्या पाच महिन्याहून अधिक काळ झालं एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीत एसटीचे विलिनीकरण झालेच पाहिजे या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.

त्यामुळं अद्याप यावर काही तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण शक्य नाही, या शिफारशींसह हायकोर्टानं नेमलेल्या त्रिसदस्स्यीय समितीच्या शिफारशींनुसार कामगारांच्या इतर सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली होती.

दरम्यान, एसटी महामंडळानं मंगळवारी आपली मूळ याचिकाच आता मागे घेण्याची तयारी कोर्टासमोर दर्शवली. मात्र मुख्य न्यायमूर्तींनी महामंडळाला सबुरीचा सल्ला दिला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत हायकोर्टात आज पुन्हा सुनावणी सुरू आहे.