Narendra Modi

Narendra Modi : नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधान झाले नाही तर मी फाशी घेईन; ‘या’ आमदाराचे मोठे वक्तव्य

548 0

हिंगोली : शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांनी अजून एक वक्तव्य केले आहे. यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 2024 मध्ये जर नरेंद्र मोदी पंतप्रदान झाले नाहीत तर मी भरचौकात फाशी घेईन असे त्यांनी म्हंटले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार प्रकरणी निकाल दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना संतोष बांगर यांनी हे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले संतोष बांगर?
एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. आताही छातीठोकून सांगतो 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार. जर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नाहीत तर हा संतोष बांगर भरचौकात फाशी घेईल. या देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी झाल्याशिवाय राहणार नाही.

या अगोदरदेखील केले वादग्रस्त वक्तव्य
संतोष बांगर यांनी याआधी कलमनुरी बाजार समिती निवडणुकीवेळी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 17 जागांवर विजय मिळाला नाही तर मिशा ठेवणार नाही असं ते म्हणाले होते. त्या निवडणुकीत त्यांच्या केवळ पाचच जागा निवडून आल्या होत्या. मिशा काढण्याचं विधान केलं पण जागा कमी आल्यानंतर त्यांनी मिशा काढल्या नाही. मात्र त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Budget 2024 : ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प; मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट ! ‘त्या’ दोघांनादेखील पोलिसांकडून अटक

Rohit Sharma : रोहित शर्मा रचणार इतिहास ! ‘हे’ 3 विक्रम मोडण्याची आहे संधी

Jalgaon Accident : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाईकस्वारांना धडक

Shiv Sena : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावले प्रतोदपदी; आता पुढे काय?

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!