शिवसेनेचे रघुनाथ कुचिक यांची ‘ती’ टेस्ट खोटी, पीडित तरुणीचा आरोप

383 0

पुणे- शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. या प्रकरणी कुचिक यांच्या विरोधात गुन्हा देखील झाला आहे.
त्यानंतर कुचिक यांनी आपण वडील होऊ शकत नसल्याचं वैद्यकीय चाचणीतून सिद्ध झाल्याचा दावा केला होता. मात्र रघुनाथ कुचिक यांनी केलेली ही टेस्ट खोटी असून माझं गर्भपात झालेलं बाळ त्यांचचं होतं असा आरोप देखील पीडीतेने केला आहे.

संबंधित पिडीतेने आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याबाबत बोलताना पीडित तरुणीने म्हटले आहे की, रघुनाथ कुचीक प्रत्येक गोष्ट खोटं बोलत आहेत, आतापर्यंत मी गप्प होते कारण माझ्याकडे माझ्या डीएनए चाचणीचा रिपोर्ट नव्हता, पण आता तो आला आहे. आता रघुनाथ कुचिक यांनी सुद्धा आपली डीएनए टेस्ट करावी अशी मागणी पीडितेने केली आहे.

रघुनाथ कुचिक नेहमी मला मेसेज करायचे, आणि आता ते म्हणतात की माझा नंबर मॉर्फ करून वापरला गेला, मात्र तसं नसून मी त्या नंबरची फॉरेन्सिक टेस्ट केली आहे आणि ती टेस्ट सरकारी असते. ज्या फोरेन्सिक टेस्टमधून सगळे काही उघड झाल असून आता ती फॉरेन्सिक रिपोर्ट देखील मी कोर्टात देणार असल्याचं तरुणीने सांगितले आहे त्याचबरोबर कुचिक काही बेकायदेशीर धंदे करत असल्याचे पुरावे देखील मी कोर्टात देणार असल्याचं त्या पिडीतेने सांगितले.

‘मी मदतीसाठी आत्तापर्यंत शिवसेना नेते संजय राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांना देखील मी १० वेळेस कॉल केला पण त्यांनी उत्तर दिले नाही अशी माहिती पीडित तरुणीने दिली. या सगळ्या प्रकरणी काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुचीक यांच्या मुलीने आरोप करत असलेल्या तरुणीची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगेचच ती मागणी मान्य देखील केली आहे. आता त्यावर विचार होत असल्याचं सांगितलं जात आहे.

Share This News
error: Content is protected !!