CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये

379 0

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जखमी रुग्णासाठी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे त्याचा जीव वाचला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुंबईहून नागपुरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपुरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे त्यांना समजले. याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईकचालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगन आर कारही येऊन धडकली. त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली, ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकखालून बाहेर काढायला लावले. त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने तत्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले. यानंतर या तरुणाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

गिरीश केशरावजी तिडके असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (राहणार मौदा नागपूर) यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले आहेत. या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत. सध्या त्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ शिलेदाराने साथ सोडत शिवसेनेत केला प्रवेश

Chandrakant Patil : भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

Ranbir Kapoor : ‘ॲनिमल’च्या पुढच्या भागात ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!