भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरु

213 0

औरंगाबाद- माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच लोणीकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोणीकर यांनी एका वीज अभियंत्याला फोनवरून शिविगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लोणीकर यांच्या बंगल्यातील विजेचे मीटर काढून नेल्याच्या कारणास्तव लोणीकर यांनी वीज अभियंता दादासाहेब काळे यांना शिवीगाळ केल्याचे या ऑडिओ क्लिपमधून ऐकू येत आहे. मात्र दादासाहेब काळे याणी आपण वीज मीटर काढून नेला नसल्याचे सांगत आहेत.

या संवादाची ओडिओ क्लिप समोर आल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदवले यांनी यांनी दिली आहे.

इतकंच नाही तर लोणीकर यांच्या विरोधात गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोघांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. .

Share This News
error: Content is protected !!