नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षात म्हणजे 2024 (U-19 World Cup 2024) मधल्या जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही वर्ल्डकपची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. या विश्वचषकाची सुरुवात दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्याने होणार आहे.
टीम इंडियाचे वेळापत्रक
टीम इंडिया (Team India) असलेल्या ग्रुपमध्ये बांगलादेश, आयर्लंड, यूएसए आणि बांगलादेश संघांचा समावेश आहे. भारताचे ग्रुपमधले तीनही सामना ब्लोमफोंटेनमध्ये होणार आहेत. भारताचा ग्रुपमधला पाहिला सामना 20 जानेवारीला बांगलादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 25 जानेवारीला आयर्लंडविरोधात आणि 28 जानेवारीला यूएसएविरोधात तिसरा सामना खेळवला जाणार आहे.
अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 16 संघांचा समावेश असणार आहे. यामध्ये भारतासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्टइंडिज ,झिम्बाब्वे, नामिबिया, न्यूझीलंड, नेपाळ, स्कॉटलँड आणि यूएसए यांचा समावेश आहे.
ICC U19 स्पर्धेतले ग्रुप
ग्रुप A: भारत, बांग्लादेश, आयर्लंड, यूएसए
ग्रुप B: इंग्लंड, दक्षिण आफ्रीका, वेस्टइंडीज, स्कॉटलँड
ग्रुप C: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया
ग्रुप D: अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूजीलँड, नेपाळ
अंडर-19 वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ
अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरवेल्ली अवनीश राव (विकेटकीपर), सौम्य कुमार पांडे (उप-कर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिम्बानी, नमन तिवारी.
ट्रॅव्हलिंग स्टँडबाय खिलाड़ी: प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमान.
राखीव खेळाडू: दिग्विजय पाटिल, जयंत गोयत, पी. विग्नेश, किरण चोरमले
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Madhya Pradesh : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! शिवराज मामा नाहीतर तर ‘या’ नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड
Jalgaon Crime : लग्नघरात शोककळा ! जुन्या वादाच्या रागातून भावी नवरदेव तरुणाची हत्या
Jalna Firing : खळबळजनक ! जालन्यात भरदिवसा गोळीबार; 1 जणाचा मृत्यू
Pune University : पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
Article 370 : कलम 370 रद्द निकालाबाबत PM मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली;डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती
Farmer Suicide : धक्कादायक ! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
Ajmal Shareef : स्वतःलाच श्रद्धांजली वाहत ‘या’ प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची आत्महत्या
Article 370 Verdict : कलम 370 रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय
MNS Protest : मनसैनिक आक्रमक; ‘या’ मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन
Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज