पेट्रोल-डिझेल 80 पैशांनी महागलं, नऊ दिवसात आठव्यांदा वाढले इंधनाचे दर

212 0

पुणे- देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या 9 दिवसात ही आठवी इंधन भाववाढ आहे. रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे.

जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. यावरुन विरोधीपक्षाने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. वाढत्या इंधनाच्या दरावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी राज्यसभेत इंधन दरवाढीवर स्पष्टीकरण दिले आहे.

निर्मला सीतारमण म्हणाल्या की, इंधनाच्या वाढत्या किंमती आपल्यासाठी एक मोठं आव्हान आहे. 2010-11 पासून 2021-22 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील सेससाठी केंद्र सरकारने 11.37 लाख कोटी रुपये खर्च केलेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide