बालभारती ते पौडफाटा रस्ता पर्यावरणपूरक होणार – सिद्धार्थ शिरोळे

174 0

पुण्यातील लॉ कॉलेज रोड परीसरातील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून बालभारती ते पौडफाटा रस्त्यास पुणे महानगरपालिकेची मान्यता मिळाली असून आज शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बालभारती येथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.

सदरील प्रस्तावित रस्त्याचा DPR करण्याचे काम सुरु झाले आहे. हा रस्ता २.१ किमी चा असून २०२२ च्या दिवाळी पर्यंत या रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरु होणार आहे. सदरील रस्ता पर्यावरणपुरक होणार असून यातून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली.

यावेळी गणेश बगाडे, पुणे महानगरपालिकेचे पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!