breking News श्रीरामपूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी

517 0

श्रीरामपूर- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात पसरली असून संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूरमधील एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Share This News
error: Content is protected !!