PCB

Babar Azam : बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा देताच पाकिस्तानने ‘या’ दोन खेळाडूंची केली कर्णधारपदी निवड

787 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमने (Babar Azam) कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता पीसीबीने शाहीन शाह आफ्रिदीला टी-20 आणि शान मसूदला कसोटी फॉरमॅटचा कर्णधार बनवले आहे. तर, वनडे फॉरमॅटसाठी अद्याप कर्णधाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

पाकिस्तानची विश्वचषकातील कामगिरी
विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात, पाकिस्तानने एकूण 9 सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकले आणि 5 सामने गमावले. यामुळे पाकिस्तान विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. टीमच्या या खराब कामगिरीनंतर पीसीबीने पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेक बदल केले आहेत. बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर पीसीबीने दोन्ही फॉरमॅटसाठी नवीन कर्णधारांच्या नावांची घोषणा केली.

पीसीबीने शाहीन शाह आफ्रिदीला टी-20 आणि शान मसूदला कसोटी फॉरमॅटचा कर्णधार बनवले आहे. तर, वनडे फॉरमॅटसाठी अद्याप कर्णधाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही.शाहिन शाह आफ्रिदी याच्याकडे एकदिवसीय फॉरमॅटचेही कर्णधारपद येऊ शकते अशी चर्चा सुरु आहे मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!