Nashik News

Nashik News : नाशिक हादरलं! फटाके फोडण्यावरुन झालेल्या वादातून तरुणाची निर्घृणपणे हत्या

590 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये फटाके फोडण्याच्या कारणातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. नाशिकच्या पाथर्डी परिसरात ही घटना घडली आहे. किरकोळ कारणातून तरुणाची हत्या झाल्याने दिवाळीच्या सणाला देखील गालबोट लागला आहे. फटाके फोडण्यावरुन हा वाद झाला होता.

गौरव तुकाराम आखाडे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. फटाके इथे फोडू नका मैदानात फोडा असं सांगितल्याचा राग आल्याने तरुणांनी गौरव तुकाराम आखाडे यांच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला पोहोचला आणि त्याचा राग डोक्यात ठेवून तरुणांनी गौरव यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्यांची निर्घृणपणे हत्या केली आहे.

या घटनेमुळे परिसरात काहीवेळ तणावाचं वातावरण होतं. हत्या झालेले गौरव हे 31 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लहान मुलं घाबरतात म्हणून त्यांनी तरुणांना घराबाहेर फटाके फोडू नका मैदानात जाऊन फोडा हे सांगितलं आणि तेच सांगणं त्यांच्या जीवावर बेतलं आहे.या प्रकरणी पत्नी सपना यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!