Dead Body

Utter Pradesh : मृत्यूनंतरही यातना! रुग्णवाहिका नसल्याने भावावर बहिणीचा मृतदेह पाठीवर बांधून नेण्याची आली वेळ

457 0

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील (Utter Pradesh) औरैया येथील बिधुना येथील सरकारी रुग्णालयातून (Government Hospital) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या रुग्णालयातील एका तरुणाला आपल्या बहिणीचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याला अक्षरश: मृतदेह पाठीला बांधून दुचाकीवरून न्यावा लागला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे आता उत्तर प्रदेशातील आरोग्य सेवेच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बहिणीला वाचवण्यासाठी भावाची तळमळ
उत्तर प्रदेशातील औरैयाच्या बिधुना येथील नवीन बस्ती येथे राहणारे प्रबल प्रताप सिंह यांची मुलगी अंजली हिने मंगळवारी सकाळी पाणी गरम करण्यासाठी बादलीत हिटर टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला विजेचा धक्का बसून ती गंभीररित्या भाजली गेली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांना मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली, मात्र डॉक्टरांनी येथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगितले.

यानंतर हतबल झालेल्या भावाने बहिणीचा मृतदेह दुचाकीवर ठेवला आणि त्याच्या पाठीला ओढणीनं बांधला. यानंतर त्याने लहान बहिणीला मागे बसवले आणि घराकडे निघाले. हा प्रकार पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरले. उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या एक्स @INCUttarPradeshया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात यावा. तसेच यामधील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा
Murder Video : क्रुरतेचा कळस! जमिनीच्या वादातून अंगावर ट्रॅक्टर घालून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Viral Video : छोट्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये तुफान राडा

Viral Video : चुकीचं इंजेक्शन देऊन रुग्णालयाबाहेर काढलं अन्… आई-वडिलांसमोर तडफडत मुलीने सोडला जीव

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!