Breaking News
Jalna News

Jalna News : धक्कादायक ! ज्या शाळेत दिले ज्ञानाचे धडे त्याच ठिकाणी शिक्षकाने संपवले आयुष्य

570 0

जालना : जालना जिल्ह्यातून (Jalna News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका शिक्षकाने चक्क शाळेतच गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. ही घटना अंबड तालुक्यातील मठ तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली आहे. केरुबा दिगंबर घोडके (50) असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
केरूबा दिगंबर घोडके मठ तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. दुपारी साडेबारा वाजेच्या मधल्या सुट्टीच्या काळात मुलांना खिचडी खाण्यासाठी सोडण्यात आले. मुले खिचडी करण्यास घरी गेले असता शिक्षक केरूबा घोडके यांनी शाळेतील वर्गात लोखंडी अँगलला झेंड्याच्या दोरीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

मुले दुपारची खिचडी खाऊन परत शाळेत आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. गावकऱ्यांनी ही घटना गोंदी पोलीस स्टेशनला कळविली. त्यानंतर पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. केरूबा घोडके हे पाचोड या ठिकाणी वास्तव्यास होते.

Share This News
error: Content is protected !!