Ranjit Taware

Pune District Bank : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदी रणजीत तावरे यांची नियुक्ती

865 0

पुणे : अजित पवारांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Pune District Bank) संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे निवडणूक प्राधिकरणाकडून या ठिकाणी पोटनिवडणूक लावण्यात आली. या पदासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र या दोघांनी या पदासाठी उमेदवार अर्ज न भरल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आज ही पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये रणजीत तावरे यांची पुणे जिल्हा मध्वर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!