ब्रेकिंग ! पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; आरोपीच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

2066 0

पुणे शहरातील शिवाजीनगर परीसरात  असलेल्या एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची  घटना समोर आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती.

शाळेतील बाथरूममध्ये आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी संशयित आरोपीचं स्केचही प्रसिद्ध केलं होतं. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शिवाजीनगर येथील नामांकित शाळेच्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेने पकडलं आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोपी पीडित मुलीच्या वडिलांना ओळखत होता.

या प्रकरणी गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात येत होता. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने संबंधित शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये आरोपीची हालचाल संशयास्पद वाटली. त्यानुसार सर्व सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला. अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!